देवगड जगतापवाडी येथे विजय मेस्त्री यांच्या घराच्या स्लॅबवर माड पडून तर हिंदळे शाळेच्या छपरावर आंब्याचे झाड पडून सुमारे एक लाखांचे नुकसान

देवगड : देवगड तालुक्यात गेले दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसात देवगड बाजारपेठ जगतापवाडी येथील विजय सदानंद मेस्त्री यांच्या घरावर माड पडून घराच्या स्लॅब व बाजूच्या दगडी बांधकाम याचे सुमारे रु ९० हजार एवढे नुकसान झाले असून ही घटना रविवारी मध्यरात्री १.३० च्या सुमारास मुसळधार वारा पाऊस सुरू असताना घडली .घरावर स्लॅबला मोठा दणका बसल्याने घरातील ग्रामस्थ घाबरून गेले परंतु अन्य कोणतीही दुखापत झाली नाही या संदर्भात देवगड तहसीलदार आपत्ती निवारण कक्ष देवगड नगरपंचायत येथे या घटनेची माहिती विजय मेस्त्री यांनी दिली.घटना स्थळी या प्रभागाच्या नगरसेविका प्रणाली माने,नगरसेवक निवृत्ती उर्फ बुवा तारी, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद माने यानी भेट देऊन पाहणी केली व घरावरील पडलेला माड हटविण्यासाठी सहकार्य केले. याबरोबरच हिंदळे शाळेवर आंब्याचे झाड पडल्याने शाळेचे १८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे महसूल प्रशासन मार्फत या दुर्घटनेची रीतसर पंचयादी करण्यात येत आहे.