सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने थैमान मांडले आहे. सावंतवाडी तालुका हा सर्वात जास्त पर्जन्यवृष्टी झालेला तालुका आहे. या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आज सावंतवाडी आपत्कालीन कक्षाकडून सावंतवाडी शहरातीलbमोती तलावात प्रात्यक्षिके घेण्यात आले. यावेळी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी स्वतः बोटीत बसून आपल्या सहकाऱ्यांसमवेत तलावात पाहणी केली. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास बोटी सुस्थितीत आहे की नाही?, आपण मदत देवू शकतो की नाही?, तसेच यंत्रणा नेमकी कितपत अलर्ट आहे? अशा सर्व बाबी तपासण्यासाठी ही मोहीम घेण्यात आली, असे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी सांगितले.
यावेळी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, मुख्याधिकारी सागर साळुंखे, पालिकेचे बांधकाम अभियंता शिवप्रसाद कुडपकर, आरोग्य अधिकारी रसिका नाडकर्णी, पांडुरंग नाटेकर, स्वप्निल सोनकर, नरेंद्र बोधे आदी अधिकारी उपस्थित होते.
Home ब्रेकिंग न्यूज मोती तलावात आपत्कालीन यंत्रणेची प्रात्यक्षिके |तहसीलदारांसह एसटी, पालिकेच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती..!





