माघवारी पायी दिंडीचे शिरगांवहून १९ जानेवारीला श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान…!

देवगड : देवगड तालुक्यातील शिरगांव वारकरी सांप्रदाय मंडळाची गुरुवार १९ जानेवारीला माघवारी पायी दिंडी शिरगाव बाजारपेठ येथील हनुमान मंदिरातून श्री क्षेत्र पंढरपूरकडे सकाळी ७ वाजता प्रस्थान करणार आहे. पुढे सिधुदुर्ग जिल्हा वारकरी माघवारी समता पायी दिंडीमध्ये सहभागी होणार आहे. या सोहळ्यात सर्व वारकरी भक्तांनी सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी ह.भ.प सर्वोत्तम साटम महाराज यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.