सावंतवाडीत अतिवृष्टीने उडाली दणादाण ; अनेक भागात घरांचे नुकसान..!

148

सावंतवाडी :आज अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड व गडगा कोसळला तर भटवाडी मध्ये राणेपाणन या ठिकाणी सकाळी झाड पडून रस्ता विज वाहिन्या तुटून रस्ताही बंद झाला होता त्या ठिकाणी सकाळी सात वाजता सामाजिक बांधिलकीचे टीम पोचून संजय पेडणेकर, शाम हळदणकर, अशोक पेडणेकर व रवी जाधव यांनी झाड तोडून रस्ता मोकळा केला तसेच दुपारी भटवाडी येथे सुभाष नाईक व गणेश नाईक यांच्या घरावर झाड पडून मोठ्या नुकसान झाले त्या ठिकाणी हि सामाजिक टीम जाऊन सदर घरावर पडलेले झाड तोडून घरावर प्लास्टिक कापड घालून दिले सदर नाईक यांच्या घराचे नुकसान झाले आहे तसेच भटवाडी येथील वेद पाठशालेचे कंपाउंडऑल कोसळून रस्त्यावर पडली असता रस्ता वाहतुकीस बंद झाला होता.

अशावेळी सुद्धा सामाजिक बांधिलकीचे शरद पेडणेकर यांनी सतर्कता दाखवून नगरपरिषदेला कळवले घटनास्थळी नगरपालिका ची कर्मचारी दाखल होऊन त्यांनाही हातभार लावला रस्ता मोकळा केला सामाजिक बांधिलकी आपत्कालीन टीमच्या कार्याबद्दल ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.प्रसंगी संजय पेडणेकर श्याम हळदणकर, शेखर सुभेदार, मोहन गावडे व नगर परिषद कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले.