३० जुलै रोजी ठाणे येथे ज्येष्ठ अनुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांची प्रकट मुलाखत..!

54

ठाणे : समाजाच्या विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींच्या जीवनवाटचालीचं, त्यांच्या विचारशैलीचं दर्शन सर्वाना घडावं, या दृष्टीकोनातून वैष्णो व्हिजन या संस्थेच्या संकल्पनेतील भेट दिग्गजांची या प्रकट मुलाखत मालिकेचा पहिला वहिला कार्यक्रम वैष्णो व्हिजन आणि ग्रंथाली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. या प्रकट मुलाखत मालिकेतील शुभारंभ कार्यक्रमात ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय अणुशास्त्रज्ञ,

पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांची प्रकट मुलाखत होणार असून यावेळी त्यांचा संयोजकांच्या वतीने यथोचित सत्कारही केला जाणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत – जेष्ठ पंचांगकर्ते श्री. दा. कृ. सोमण (खगोलशास्त्र अभ्यासक ) तसेच या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी, जेष्ठराज जोशी (अध्यक्ष मराठी विज्ञान परिषद), हे असून प्रमुख पाहुणे म्हणून ठाण्याचे पोलीस सहआयुक्त शदत्तात्रय कराळे, ठाणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, ठाणे जनता सहकारी बँकेचे चेअरमन शरद गांगल आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज ॲन्ड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी उपस्थित राहणार आहेत. रविवार दि. ३० जुलै २०२३ रोजी संध्याकाळी ५.३० वा. सहयोग मंदिर, घंटाळी, नौपाडा, ठाणे (प.) येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालक आणि मुलाखतकार सुप्रसिद्ध निवेदिका – मनाली दीक्षीत असून कार्यक्रम सर्वासाठी विनामूल्य आहे. या कार्यक्रमात सर्वानी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन वैष्णो व्हिजन संस्थेचे निर्माता, दिग्दर्शक जयु भाटकर यांनी केले आहे.