मुंबईः विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी शिंदेंना पाठिंबा देत शिवसेनेत प्रवेश केला. त्यावर विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी आक्षेप घेतला होता. त्यावर उपमुख्यमंत्री यांनी स्पष्टीकरण दिले होते. परंतु आता त्यांच्या पदाला कुठालाही धोका नसल्याचा निर्णय तालिका सभापतींनी दिला आहे.
पक्षांतरांच्या बाबतीत घेतलल्या आक्षेपात सभापती किंवा उपसभापती यांनी पक्षांतर केले तर ते अपात्र (निरह) ठरणार नाही. या पदाला तशी सूटही कायद्यात देण्यात आलेली आहे. निलम गोऱ्हे यांनी ज्या पक्षाला पाठिंबा दिला तो पक्ष बदलला नाही. चिन्ह व नाव हे त्याच पक्षाचे आहे.





