प्रभाकर सावंत भाजपचे नवे जिल्हाध्यक्ष |निष्ठेचे मिळाले फळ ; भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह..!

46

सावंतवाडी : भाजपचे निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्ते असलेले प्रभाकर सावंत यांची भाजप प्रदेश स्तरावरून जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. विद्यमान भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर नवीन जिल्हाध्यक्ष नेमणूक करण्यासाठी कार्यक्रम राबविण्यात आला.
यात सावंत यांनी बाजी मारलेली आहे. या पदासाठी अनेक नावे पुढे आली होती. मात्र, प्रभाकर सावंत यांच्या नावाला सहमती देत प्रदेश भाजपने नाव जाहीर केले आहे. या निवडीनंतर प्रभाकर सावंत यांच्यावर भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व मित्रमंडळी यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे. सावंत सध्या जिल्हा संघटक या पदावर कार्यरत होते.