मुंबई- मजबूत जागतिक संकेत, हेवीवेट स्टॉक्समध्ये जोरदार खरेदी आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या वाढत्या ओघामुळे भारतीय शेअर बाजाराची विक्रमी घौडदौड कायम आहे. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्सने (Sensex) ३५० अंकांनी वाढून ६६,९४० वर झेप घेतली. तर निफ्टी (Nifty) १९,८०० जवळ पोहोचला. त्यानंतर सेन्सेक्स २०५ अंकांच्या वाढीसह ६६,७९५ वर बंद झाला. तर निफ्टी ३७ अंकांनी वाढून १९,७४९ वर स्थिरावला.
क्षेत्रीयमध्ये मेटल निर्देशांक १ टक्क्याने आणि रियल्टी निर्देशांक प्रत्येकी ०.५ टक्क्यांने घसरला, तर पॉवर इंडेक्स ०.६ टक्क्यांनी आणि आयटी इंडेक्स १ टक्क्याने वाढला. (Stock Market Closing Bell) बीएसई मिडकॅप निर्देशांक सपाट बंद झाला, तर स्मॉलकॅप निर्देशांक ०.४५ टक्क्यांनी घसरला.
सेन्सेक्सवर इन्फोसिसचा शेअर टॉप गेनर होता. हा शेअर ३.७४ टक्के वाढून १,४७६ रुपयांवर पोहोचला. त्यासोबतच एशियन पेंट्स, एचसीएल टेक, रिलायन्स, आयसीआयसीआय बँक, विप्रो हे शेअर्सही वाढले. तर एसबीआय, टायटन, बजाज फायनान्स, सन फार्मा, टाटा मोटर्स, टाटा स्टील हे शेअर्स घसरले.





