लंडनच्या संसदेत डॉ. सतीश नारिंग्रेकर यांचा सन्मान ;नारिंग्रे येथे कौतुक सोहळा संपन्न..!

111

देवगड : नारिंग्रे गावचे सुपुत्र व नारिंग्रे शिक्षण संस्था मुंबई संचलित एस. बी. राणे हायस्कूल नारिंग्रेचे माजी विद्यार्थी डॉ. सतीश अर्जुन नारिंग्रेकर यांचा हाऊस ऑफ कॉमन्स लंडन संसद येथे सत्कार करण्यात आला. भारताच्या शिक्षण क्षेत्रात उल्लेखणीय कामगिरीची दखल घेत त्यांना लंडनच्या संसदेमध्ये सन्मानित करण्यात आले. नारिंग्रे हायस्कूलमध्ये शनिवार १५ जुलै रोजी गावाच्या वतीने कौतुक सोहळा पार पडला.

यावेळी माजी सभापती सुनीलभाई पारकर, नारिंग्रे सरपंच महेश राणे, हिंदळे सरपंच मकरंद शिंदे, संस्थेचे सचिव विठ्ठल राणे माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, दीपक घाटे, डॉ. सतीश नारिंग्रेकर, नैना नारिंग्रेकर, रघुवीर वायंगणकर, माधवी इंदप, उपसरपंच महेश जंगले, प्रकाश नारिंग्रेकर, शीतल नारिंग्रेकर, स्मिता शेटगे, मुख्याध्यापक सुधाकर मंडले, रमेश भावे, भारत बापट, संदीप राणे, दीपक कदम, यांच्यासह नारीग्रे ग्रामस्थ उपस्थित होते,