कणकवली : देवगड आगारातून सकाळी ८:१५ वाजता सुटणारी देवगड आरे निरोम कणकवली ही गाडी देवगडच्या दिशेने असताना तोरसोळे पारवळवाडी फाट्याजवळ रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे एसटी रस्त्याच्या बाजूला गेली असताना एसटीच्या डाव्या बाजूची साईड पट्टी खचली व एसटी कलंडली त्यामुळे होणारा अनर्थ टाळला. सदरची घटना दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. दुपारची वेळ व रविवारच्या सुट्टीचा दिवस असल्यामुळे गाडीमध्ये सुदैवाने प्रवासी नव्हते.
अपघाताची माहिती मिळताच देवगड आगारातील अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.पंधरा दिवसापूर्वी देवगड आगारात दहा ते पंधरा पर जिल्ह्यातील वाहक कम चालक नव्याने हजर झाले आहेत.त्यांना कोकणातील भौगोलिक परिस्थिती अंदाज येत नसल्याने व गाड्या वेगात असल्याने अशा घटना वारंवार घडत आहेत. नव्याने दाखल झालेले चालक वाहक न पाठवता अनुभवी चालक वाहक पाठवावेत.अशी मागणी येथील ग्रामस्थ व प्रवासी वर्गामधून होत आहे





