Home महाराष्ट्र देवगड मुणगे येथे यशस्विनी प्रतिष्ठान तर्फे छत्र्यांचे वाटप..!

मुणगे येथे यशस्विनी प्रतिष्ठान तर्फे छत्र्यांचे वाटप..!

52

देवगड : मुणगे येथे यशस्विनी प्रतिष्ठान आणि संघर्ष मित्र मंडळ आडबंडर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आडबंदर, आपई,वाघोली,कारिवणे आदी भागातील ग्रामस्थांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले, पावसाळ्याचे दिवस असल्याने सर्वांनी काळजी घ्या माणुसकी कायम जपत सामाजिक बांधिलकी जोपासत असताना ग्रामस्थांचे प्रेम आशीर्वाद असेच कायम पाठीशी राहू द्या असे प्रतिपादन यशस्विनी प्रतिष्ठान अध्यक्ष आनंद मालाडकर यांनी केले, प्रतिष्ठांच्या दोन वर्षातील कार्याबद्दल दुर्गा परब यांनी प्रतिष्ठानचे अभिनंदन केले.

गावातील महिला व ग्रामस्थ आपल्या सोबत नेहमीच आहे यापुढे देखील आमचे सहकार्य प्रतिष्ठानला असेल असे प्रतिपादन रूपा मालाडकर यांनी व्यक्त केले.

यावेळी प्रतिष्ठानच्या सल्लागार रविना मालाडकर,अंजली सांवत,देवयानी राणे, तुषार आडकर,योगेश लब्दे, शिवदास रासम, अशोक सांवत,मंदार मुणगेकर,आदी उपस्थित होते, छत्र्यांचे वाटप केल्याबद्दल यशस्विनी प्रतिष्ठान अध्यक्ष आनंद मालाडकर यांचे सर्वांनी आभार व्यक्त करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.