सावंतवाडी : सावंतवाडी येथील संस्थांनचे युवराज लखमराजे भोसले यांची मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्य पदी निवड झाली आहे.सिनेटची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली होती. याचा निकाल आज जाहीर झाला असून अवघ्या कोकणातून खुल्या प्रवर्गातून युवराज लखमराजे भोसले यांना संधी देण्यात आली आहे.त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.





