साटेली-भेडशीत चोरीचा प्रयत्न फसला..!

56

दोडामार्ग : तालुक्यातील साटेली-भेडशी थोरले भरड येथे बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने बंद घराच्या छप्पराचे कौले काढत घरात प्रवेश केला. मात्र घरात कोणतीही किमती वस्तू व पैसे नसल्याने त्याचा चोरीचा प्रयत्न फसला. परंतु, गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी बुधवारी मध्यरात्री थोरले भारड येथील अमित वसंत राऊळ यांच्या बंद असलेल्या घराघराच्या क्षेत्राचे नळे काढून आज प्रवेश केला. या घरात कोणीच राहत नसल्याने व अन्य कोणतीही पैसे किंवा किमती वस्तू नसल्याने चोरीच्या उद्देशाने घरात केलेला प्रवेश अपयशी ठरला अन अज्ञात चोर फरार झाला.

या घटनेमुळे साटेली भेडशी गावासह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्रीच्या वेळी पोलिसांनी बाजारपेठेसह गावात आपली गस्त वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. तसेच सध्या पावसाळ्याचा जोर कायम आहे तर वारंवार विद्युत प्रवाह खंडित असतो अशा संधीचा चोरटे फायदा घेऊ शकतात आणि चोरीच्या घटना घडू शकतात. हे टाळण्यासाठी विज वितरण कडून अखंडित विद्युत पुरवठा सुरू ठेवावा. बंद असलेली स्ट्रीट लाईट सुरू करावी अशी मागणी ग्रामपंचायत कडून करण्यात येत आहे.