चुकून अकाऊंटला पैसे आले,परत न केल्याने ‘त्याला’ पोलिसांनी नेले..!

581

सावंतवाडी : गुजरातमधील वेल्सपन इंडिया लिमिटेड या खाजगी कंपनीचे 55 लाख रुपये चुकून सातार्डा येथील एका व्यक्तीच्या नावे खात्यावर जमा झाले होते.या घटनेला दोन महिने उलटून गेले होते.ज्या व्यक्तीचे नावे पैसे जमा झाले. त्या व्यक्तीला कंपनीकडून वारंवार पैसे परत पाठवण्यासाठी विनवणी करण्यात येत होती.मात्र सदरच्या व्यक्तीने त्याला कोणताही प्रतिसाद न देता टाळाटाळ केल्याने अखेर कंपनी व्यवस्थापनने अंजार पोलीस ठाण्यात आपली तक्रार दाखल केली.या तक्रारीला अनुसरून गुजरात पोलीस आज सातार्डा येथे येत सदर व्यक्तीला ताब्यात घेतले.

यावेळी गुजरात पोलीस ठाण्याचे पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक किशोर रामचंद्र,पोलीस कॉ. मगन भाई,पोलीस कॉ.संजय भाई हे उपस्थित होते.संशयित आरोपीला सावंतवाडी पोलीस ठाण्यात आणून गुजरातला नेण्याची पुढील कार्यवाही सुरू आहे.