रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी..!

99

सावंतवाडी :  2023 -24 या शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्याचे काम सुरू झाले आहे. दहावी उत्तीर्ण होऊन सरकार मान्य अशा कोणत्याही अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतो. त्यासाठी जाती धर्मांची बंधने नाहीत तसेच विशिष्ट गुणांची ही अट नाही. विद्यार्थी गरीब, गरजू आणि होतकरू असला पाहिजे. तसेच तो रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मूळ रहिवासी असला पाहिजे. जास्त शैक्षणिक खर्च असणारे अभ्यासक्रम जसे इंजीनियरिंग, मेडिसिन, नर्सिंग इत्यादी यात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी कर्जाऊ शिष्यवृत्तीचा पर्याय उपलब्ध आहे.

सविस्तर माहिती आणि ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मार्गदर्शन www.subhadrabaishikshannidhi.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे.