देवगड : पंचरत्न मित्रमंडळ आरसीएफ चेंबूर आणि जी के एस कला,वाणिज्य,विज्ञान महाविद्यालय खडवली यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव व वृक्षारोपणाचा कार्यक्रम नुकताच नाडगाव खडवली येथे श्री संतोष चौधरी (बिगबॉस फेम,प्रसिद्ध गायक (दादुस),मिस युनिव्हर्स 2022 च्या विजेत्या कु.अरुंधती हाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी संस्थेचे संचालक संतोष शिकतोडे,सौ. कविता शिकताडे , सरपंच सौ दिपाली शेलार उपसरपंच चेतन शेलार, मुख्याध्यापक बी.एल.जाधव, अश्विन कांबळे (वरिष्ठ प्रबंधक R C F ) आदी मान्यवर उपस्थित होते . व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच वृक्षारोपण लागवड देखील करण्यात आली.
याप्रसंगी श्री संतोष चौधरी (दादूस)व मिस युनिव्हर्स 2022 अरुंधती हाटे आदर्श मुंबईचे संपादक डॉ संजय भोईर यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करून वृक्षमित्र पुरस्कार 2023 ने त्यांना सन्मानित करण्यात आले.पंचमित्र पंचरत्न मित्र मंडळ चेंबूर आरसीएफ तर्फे गेल्या 18 वर्षाहून अधिक काळात सामाजिक क्षेत्रात विविध लोक कल्याणार्थ कार्यरत आहे मंडळाचे कार्यतत्पर अध्यक्ष व गुणवंत कामगार श्री अशोक भोईर व सहकारी प्रामुख्याने आदिवासी अंध विकलांग , वृद्धाश्रम यांना सर्वतोपरी सहाय्य करते . गरीब गरजूंसाठी निशुल्क मेडीकल कॅम्प ,नैसर्गिक आपत्तींत सापडलेल्यांना अन्नधान्य , कपडे, गृहोपयोगी वस्तू,औषधे,वह्या पुस्तके अशा विविध अंगांनी मदतही देतात.

यांशिवाय लोकांना मूलभूत हक्कांची जाणीव करून देणे,नागरी सुविधांबद्दल जागरूक करणे, बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यास साहाय्य करणे तसेच अन्य अनेक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सहकार्य करण्याचे काम पंचरत्न मित्र मंडळ गेली अनेक वर्षे निस्वार्थी पणे करीत आहे.समाजाला मदतीचा हात देत गेली अनेक वर्ष कार्यरत असलेल्या आर.सी.एफ कर्मचारी वर्गाच्या पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) चेंबुरतर्फे अध्यक्ष – अशोक भोईर,सचिव प्रदीप गावंड – खजिनदार , संतोष नाईक , डि.एफ. निंबाळकर , प्रशांत नागपुरे , रहिम शेख , जालिंदर इंगोले ,सहसचिव वैभव घरत,सौ. स्नेहा नानीवडेकर,सल्लागार हनुमंता चव्हाण,सदस्य नीलम गावंड , मॅथ्यु डिसोझा , आणि सर्व महिला -पुरुष कार्यकर्ते, सदस्य आणि सभासद यांच्या प्रयत्नाने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन सौ. स्नेहा नानिवडेकर व श्री . सुशिल मेस्त्री यांनी केले .





