रेल्वेत धूर आला तरी वाजणार अलार्म ; 200 गाड्यांमध्ये स्मोक डिटेक्शन यंत्रणा..!

37

मुंबई : बालासोर येथील रेल्वे अपघातात शेकडो प्रवाशांचे बळी गेले. त्यामुळे रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर झाले आहे. भविष्यात कोणताही अपघात घडू नये किंवा लांब पल्ल्याच्या गाडय़ांमध्ये आग लागू नये म्हणून मध्य रेल्वेने आपल्या तब्बल 200 हून अधिक एक्सप्रेस गाडय़ांमध्ये स्मोक डिटेक्शन यंत्रणा उभारली आहे. त्यामुळे एखाद्या गाडीत धूर जरी आला तरी त्याचा अलर्ट तत्काळ गार्डला मिळणार आहे.

लांब पल्ल्याच्या गाडय़ांमध्ये स्मोक डिटेक्शन यंत्रणा नव्हती. त्यामुळे एखाद्या डब्यात आग लागल्यास त्याची माहिती गार्ड किंवा लोको पायलटला वेळेत मिळत नव्हती. चार दिवसांपूर्वी तेलंगणात रेल्वेच्या तीन बोगींना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीच्या अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून मध्य रेल्वेने 204 नॉन एसी गाडय़ांमध्ये स्मोक डिटेक्शन यंत्रणा लावली आहे.

तसेच वातानुकूलित यंत्रणा असलेल्या 24 बोगींमध्ये तर 137 पॉवर कारमध्येही सदरची यंत्रणा लावली आहे. उर्वरित गाडय़ांमध्येही ही यंत्रणा लवकरच लावली जाणार आहे.