कातवणेश्वर ग्रामस्थ उत्कर्ष मंडळ मुंबई व स्थानिक ग्रामस्थ यांनी घेतला पुढाकार..
देवगड : (स्वप्नील लोके) कातवणेश्वर ग्रामस्थ उत्कर्ष मंडळ मुंबई व कातवणेश्वर वाडी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने अँड वासुदेव दत्तात्रय मुणगेकर यांच्या संकल्पनेतून कातवणेश्वर समुद्रकिनारा या ठिकाणी रविवार ९ जुलै २०२३ रोजी सकाळी ९ वाजता अँड वासुदेव मुणगेकर,कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष संतोष लब्दे,सरपंच शशिकांत लब्दे गोविंद घाडी यांच्या हस्ते कल्पवृक्ष लागवड करून या वृक्षारोपण उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.तसेच या ठिकाणी ग्रामस्थांनी नव्याने खोदाई केलेल्या बोअरवेलचा शुभारंभ देखील करण्यात आला.

अँड वासुदेव पेडणेकर यांच्या संकल्पनेतून कातवणेश्वर ग्रामस्थ उत्कर्ष मंडळ मुंबई आणि वाडी ग्रामस्थ यांनी पर्यावरण रक्षणासाठी एकत्र येत वृक्षारोपण आणि संवर्धन करून कातवणेश्वर समुद्रकिनारा पूर्वरत हिरवागार आणि नयनरम्य करण्याचा संकल्प केला होता. गावातील सर्व मंडळींनी निर्धार पक्का शपथेवर शिक्का मोर्तब करायचे ठरविले होते. त्यानुसार या सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत कातवणेश्वर समुद्रकिनारी वृक्षारोपण करण्यास सुरुवात केली.


या वृक्षारोपण उपक्रमाचा शुभारंभ नेव्ही ऑफिसर मंगेश दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.यावेळी कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष संतोष लब्दे, दिनेश धुवाळी, माजी सरपंच गोविंद घाडी,ग्रामसेवक गुणवंत पाटील, कातवणेश्वर वाडी अध्यक्ष प्रदीप मुणगेकर, सत्यवान तेली,संजय आचरेकर डॉ रामदास बोरकर, गजानन गावडे, नागेश आचरेकर , मंगेश पेडणेकर ,नामदेव कांबळे संकेत लब्दे, प्रल्हाद गावडे ,कातवणेश्वर प्राथमिक शाळेचे शिक्षक धर्मराज धुरत, सोमनाथ तांबे, माजी सरपंच सौ दीपिका मुणगेकर, प्रणिता पेडणेकर सुमेधा पेडणेकर ,नेहा पेडणेकर, सीमा पेडणेकर संचिता पेडणेकर,आदींसह कातवणेश्वर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वृक्षारोपण उपक्रमा दरम्यान कल्पवृक्ष (माड) पिंपळ,वड, काजू,आवळा, औदुंबर, जांभूळ अशी मिळून एकूण ३०० झाडे लावण्यात आली. यामध्ये २०० माडांच्या झाडाचा समावेश आहे. यासाठी कुणकेश्वर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून १०० माडांची झाडे देण्यात आली असे यावेळी सरपंच माजी चंद्रकांत उर्फ गोविंद घाडी यांनी सांगितले.






