दि देवगड अर्बन बँकेच्या तज्ज्ञ संचालक म्हणून ॲड. प्रणाली माने यांची निवड..!

53

देवगड :  दि देवगड अर्बन को-ऑप बँक लि, देवगडच्या संचालक मंडळावर तज्ञ संचालक म्हणून देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या नगरसेविका अँड.सौ प्रणाली मिलिंद माने यांची निवड करण्यात आली आहे.

नुकत्याच संपन्न झालेल्या सभेमध्ये विचार विनिमय होऊन संचालक पदाचे पात्रता निकष पूर्ण करीत असल्याने त्यांची सभेतील ठराव क्रमांक 25 ने बँकेच्या संचालक मंडळावर 1 जुलै 2023 पासून तज्ञ संचालक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. या बददल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.