मनपा आयुक्त इक्बालसिंह चहल यांची ईडी कडून चौकशी…!

मुंबई : मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची आज अंमलबजावणी संचालनालयाकडून म्हणजेच ईडीकडून चौकशी होणार आहे. चहल हे ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. कोरोना काळातील टेंडर मंजूर झाले होते, त्याची तसेच कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ही चौकशी होणार आहे. माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीवरून ईडीने चहल यांना समन्स बजावले होते. आपण ईडीला पूर्णपणे सहकार्य करु अशी प्रतिक्रिया इक्बाल सिंह चहल यांनी दिली आहे.