बांदा : शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे .तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या कचरा गाडीची मर्यादा कमी असल्याने कचरा उचलण्याची मर्यादा येत आहे.त्यामुळे ग्रामपंचायतीसाठी कचरा व घंटा गाडी मिळावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य तथा ऊबाठा शिवसेना शहरप्रमुख साईप्रसाद काणेकर यांनी शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्याकडे निधीची मागणी केली होती.दरम्यान मंत्री दिपक केसरकर यांनी काणेकर यांच्या मागणीला तात्काळ मंजुरी देत १२ लाखांचा निधी मंजूर केला आहे.निधी मंजुरीचे पत्र संबधित प्रशासनाला पाठविण्यात आला असून लवकरच बांदा शहरासाठी नवीन कचरा व घंटा गाडी उपलब्ध होणार आहे.केसरकर यांनी निधी मंजूर केल्याबद्दल काणेकर यांनी त्यांचे आभार मानले आहेत.





