रेड अलर्ट जारी ; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
कणकवली : मागील दोन दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून अतिमुसळधार पावसाने गुरुवारी सायंकाळपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरुवात केली आहे. शुक्रवारी पहाटेपासूनच पावसाने जोरदार सुरुवात केली असून, मुसळधार पावसासह तीव्र स्वरूपाचे वादळ देखील होत आहे. अनेक ठिकाणी पडझडीची घटना घडत आहेत.

मात्र याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग तीन दिवस अतिमुसळधार पाऊस असल्यामुळे प्रशासनाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील प्रशासन, यंत्रणेकडून देण्यात आलेला आहे.





