दिल्ली : भारतीय रेल्वे सामान्य प्रवाशांसाठी आरामदायी आणि किफायतशीर प्रवास सुनिश्चित करण्यासाठी पावले उचलत आहे . स्लीपर आणि सामान्य सुविधांसह नॉन-एसी वंदे साधारण ट्रेन सेवा लवकरच सुरू करणार आहेत.
अंदाजे 65 कोटी रुपयांच्या या ट्रेन्सची निर्मिती प्रक्रिया ICF चेन्नई येथे होणार आहे आणि ट्रेनचा शुभारंभ या वर्षाच्या अखेरीस सुरू होणार आहे.
माहितीनुसार , वंदे साधारण ट्रेनला 24 LHB कोच आणि दोन लोकोमोटिव्ह पुढील आणि मागील या दोन्ही टोकांना असतील. या वंदे साधारण ट्रेनमध्ये, प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा देखील उपलब्ध असणार आहेत . यामध्ये बायो-व्हॅक्युम टॉयलेट, प्रवासी माहिती प्रणाली आणि प्रत्येक सीटवर चार्जिंग पॉइंट , प्रवाशांची सुरक्षा वाढवण्यासाठी प्रत्येक डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील.
याशिवाय, वंदे भारत एक्स्प्रेसप्रमाणेच ही ट्रेन स्वयंचलित दरवाजा प्रणालीने सुसज्ज असेल. विशेष म्हणजे, सीसीटीव्ही कॅमेरे, बायो- टॉयलेट्स आणि स्वयंचलित दरवाजे यासारख्या सुविधाच या वंदे साधारण ट्रेनची वैशिष्ट्ये असतील . आता प्रतीक्षा आहे ती केवळ शुभरंभाची .





