अतिवृष्टीमुळे हळवल येथील शैलेश राणे यांच्या घराची भिंत व कौल पडून ४५००० चे नुकसान.!

80

कणकवली : तालुक्यात बुधवारी सकाळपासूनच दिवसभर रिमझिम पाऊस सुरू होता. या झालेल्या पावसामुळे शैलेश धोंडी राणे रा. हळवल यांच्या घराची भिंत व कौल पडून साधारणपणे ४५००० हजारांचे नुकसान झाले. साधारणतः कणकवली तालुक्यात बुधवारी ६१.२ (६२०.३) मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. याबाबतची माहिती मिळताच हळवल तलाठी यांनी नुकसानग्रस्त घराची पाहाणी करून संबंधित घराची नोंद केली आहे.