तिरोडा ग्रामपंचायतचा निष्काळजीपणा, कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणामुळे सामान्य नागरिकांचा जीव धोक्यात

192

सावंतवाडी : तालुक्यातील तिरोडा गावातील संदेश शेट्ये यांच्या घरालगत रस्त्याची माती अनधिकृत रित्या कंत्राटदाराने पोखरल्याने पावसाळ्यात घराखालील माती कोसळून घराला धोका निर्माण झाला आहे.

तिरोडा ग्रामपंचायतने कंत्राटदाराला घराखालील संरक्षक भिंतीचे काम दिले असून त्याच्या हातात वर्क ऑर्डर यायच्या अगोदर घरातील व्यक्तीला माती काढून काम चालू करतो असे आश्वासन देऊन जेसीबीच्या साहाय्याने घराखालील माती एप्रिल 2023 रोजी काढली मात्र अद्याप पावसाळा आला तरी कंत्राटदाराकडे वर्क ऑर्डर नसल्याने ते काम चालू केले नसल्याचे दिसून येते.
आता घराखालील माती कोसळून संदेश शेट्ये यांच्या घराला धोका निर्माण झाला आहे ग्रामपंचायतला वारोवार सांगून सुद्धा तिरोडा ग्रामपंचायत बेजबाबदार पणाने या गोष्टी कडे दुर्लक्ष करत आहे. जर अजून माती कोसळून घर कोसळले तर ग्रामपंचायत समोर जाऊन आत्म दहन करण्यात येईल असा इशारा संदेश शेट्ये यांनी दिला आहे