सार्वजनिक बांधकामचे विभागीय आरेखक आनंद कासार्डेकर यांचे कार्य कौतुकास्पद – अजयकुमार सर्वगोड

74

कणकवली : सार्वजनिक बांधकाम विभागाचे विभागीय आरेखक आनंद कासार्डेकर हे नियत वयोमानानुसार ३८ वर्षे शासकीय सेवा बजावून सेवेतून निवृत्त झाले. १४ जानेवारी १९८६ मध्ये कणकवली सा. बां. विभागामध्ये नियुक्त झालेले आनंद कासार्डेकर यांनी वेगुले सावंतवाडी, कुडाळ, किनारी अभियंता मुंबई, बांद्रा, मंत्रालय मुंबई कोकण भवन, नवी मुंबई तसेच मार्ग प्रकल्प विभाग रत्नागिरी येथे सेवा बजावली.
त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे व सामाजिक जाणिवेतून मंत्रालय मुंबई व कोकण भवन येथे असताना कर्मचारी, अधिकारी यांना त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मार्गदर्शन व सहकार्य केले.

सुस्वभावी, परोपकारी, प्रामाणिकपणा या त्यांच्या स्वभवामुळे अनेकांशी त्यांचे मैत्रीचे संबंध राहिले. सा.बां. विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. अजयकुमार सर्वगोड यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देवून त्यांना गौरविण्यात आले. त्यावेळी उपकार्यकारी अभियंता श्री. दिवटे, व कणकवली उपविभागाचे उपअभियंता श्रीम. प्रभु मॅडम, वैभववाडी उपविभागाचे उपअभियंता श्री. जोशी, देवगड उपविभागाचे उपअभियंता श्री. बासुतकर व अन्य कर्मचारी व अभियंता वर्ग उपस्थित होते. सर्वांनी आपल्या भाषणातून त्यांना पुढील निरोगी दिर्घायुष्यशासाठी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचलन पराडकर कार्या. अधीक्षक यांनी केले.