भटवाडी जि. प. शाळा नं.6 मध्ये मुलांना गणवेश वाटप | माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांचि प्रमुख उपस्थिती

54

सावंतवाडी : कै. लक्ष्मीबाई मुरारी माधव आदर्श पुरस्कार प्राप्त विद्यालय जि. प. शाळा नं 6 भटवाडी सावंतवाडी या शाळेमध्ये सर्व शिक्षा अभियानामार्फत मुलांना माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी दिपाली भालेकर म्हणाल्या की, मुलांनी चांगल्या प्रकारे शिक्षण घ्यावे व शाळेचे नाव मोठे करावे, तसेच आपलं भवितव्य उज्वल करा असे सांगत त्यांनी मुलांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी शाळेच्या अध्यक्षा अनिशा राणे, शिक्षणतज्ज्ञ दिलीप भालेकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सायली लांबर, सहाय्यक शिक्षिका सावंत मॅडम उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सायली लांबर यांनी तर आभार सहाय्यक शिक्षिका सावंत मॅडम यांनी मानले.