बुलढाणा : बुलढाणा जिल्हयातुन जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील सिंदखेडराजाजवळ खाजगी लक्झरी बसने पेट घेतल्याने झालेल्या भीषण अपघातामध्ये 25 प्रवाशांचा जळून मृत्यू झालाय तर दोन प्रवासी जखमी झाले आहेत .जखमींना संभाजीनगर येथील रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले.

नागपूर वरून एम एच 29B E 1819 क्रमांकांची भारत ट्रॅव्हलची लक्झरी बस प्रवासी घेऊन पुणेकडे जात असताना बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गवरील सिंदखेडराजा येथील चॅनल नंबर 333 जवळ ही लक्झरी बस कठड्याला आदळली आणि पलटली त्यानंतर लक्झरी बसला आग लागली. या आगीमध्येमध्ये लक्झरी बस मधील 25 प्रवाशांचा जागीच जळून जागीच मृत्यू झाला . तर दोन प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर संभाजीनगर येथे उपचार सुरू आहेत .

हा अपघात रात्री 1.30 वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती आहे या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लक्झरी बस चालकाचे गाडीवरील संतुलन गेल्याने ही बस रस्त्यालगतच्या कठड्याला जाऊन धडकली त्यानंतर बसच्या डिझेल टॅंक मध्ये आग लागली व बसने पेट घेतला . आगी नंतर पाच-सहा प्रवासी हे बाहेर निघू शकले. उर्वरित 25 प्रवाशांचा जळून मृत्यू झाला . त्यामध्ये तीन बालकांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा पोलिसांनी दिली आहे.





