सावंतवाडी : आजरा येथील नाट्य स्पर्धेत सावंतवाडीच्या संगीत मत्स्यगंधा या नाटकाला सांघिक प्रथम क्रमांक मिळाला.
आजरा येथील नवनाट्य कलामंच संस्थेने आयोजित केलेल्या कै.रमेश टोपले स्मृती नाट्यमहोत्सव स्पर्धेत क्षितिज इव्हेंट सावंतवाडीच्या “संगीत मत्स्यगंधा” नाटकाने सांघिक प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तसेच संगीत मत्स्यगंधा नाटकामध्ये सत्यवतीची भूमिका करणाऱ्या दिव्या पळसुलेदेसाई यांना स्त्री अभिनयाच्या प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले. सादर केलेले नाटक रसिकांच्या पसंतीला उतरले.
आजा-यासारख्या ग्रामीण भागात केलेले नाट्यमहोत्सवाचे उत्तम, नीटनेटके आयोजन आणि त्याला मिळणारा रसिकांचा उदंड प्रतिसाद ही खरोखर खुपच कौतुकाची गोष्ट आहे .बक्षीस वितरण प्रसंगी प्रसिद्ध अभिनेते श्री अरुणजी नलावडे सर ,आजरा नगराध्यक्षा, तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. या स्पर्धेत नाटकाला सांघिक प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल नाटकाचे कार्यकारी निर्माते व दिग्दर्शक बाळा पुराणीक यांनी नाटकातील कलाकार, सह कलाकार व सहकार्य करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे कौतुक करत आभार व्यक्त केले.





