देवगड मळई येथे लव्ह जिहादचा प्रकार हिंदुत्ववादी संघटनांनी आणला उघडकीस, नामदार नितेश राणे यांनी घेतली गंभीर दखल
देवगड (प्रतिनिधी)
देवगड मळई येथे लव्ह जिहादचा प्रकार हिंदुत्ववादी संघटनांनी आणला उघडकीस, नामदार नितेश राणे यांनी घेतली गंभीर दखल देवगड मळई येथील सैबास आयुब खान याने आपली पत्नी सादिया खान (पूर्वाश्रमीची सोनल कदम) हिचा शारीरिक मानसिक छळ केला म्हणून त्याच्यावर देवगड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार लव जिहाद चा आहे याचा विचार करून तपास करावा अशा सूचना याप्रकरणी बंदर विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी देवगड पोलीस स्टेशनला भेट देऊन केल्यावर व दोशींवर कडक कारवाई करावी अशा प्रकारे सूचना दिले आहेत
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कुडाळ येथील कार्यकर्ते संजय पाताडे यांच्यासह नामदार नितेश राणे यांनी आज देवगड पोलीस स्टेशनला भेट दिली. याप्रकरणी लव जिहाद चा आरोप त्यांचे कुटुंबीय व संजय पाताडे यांनी केल्याने नामदार नितेश राणे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
याबाबत सविस्तर हकीकत अशी मळई, मुस्लिमवाडी येथील एका महिलेला तिच्या पतीने वारंवार मारहाण, शिवीगाळ आणि छळ करून शेवटी राहत्या घरात डांबून ठेवल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सादिया सैबास खान (वय 30, रा. मळई, मुस्लिमवाडी, ता. देवगड) यांनी तक्रार दिली आहे. आरोपी सैबास आयुब खान (वय 32, रा. मळई, मुस्लिमवाडी, ता. देवगड) हा फिर्यादीचा पती असून त्यांच्यात संमतीने विवाह झाला होता. विवाहानंतर सुरुवातीचे चार-पाच महिने संसार व्यवस्थित सुरू होता. परंतु त्यानंतर आरोपी किरकोळ कारणावरून फिर्यादीला शिवीगाळ व मारहाण करू लागला.
फिर्यादी हिच्या जेवणात मीठ कमी असणे, वेळेवर कपडे न धुणे अशा किरकोळ कारणावरून आरोपीत सतत छळ करीत असे. तो तिच्या केसांना धरून ओढणे, हाताने थप्पड मारणे, तिच्या आई-वडिलांना शिवीगाळ करणे अशा स्वरूपाचा त्रास देत असे.
दि. 21 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 8.30 वाजता झालेल्या वादानंतर आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करून मारहाण केली तसेच ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपीने पत्नीला तिच्या मुलीसह चार ते पाच दिवस घरात डांबून ठेवले.
या प्रकरणी गुन्हा क्र. 157/2025 भादंवि कलम BNS- 85, 127(3), 115(2), 351(3), 352 अंतर्गत दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सैबास आयुब खान याला अटक केली आहे.
ही कारवाई मपो. हवालदार भुजे (1126) यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली असून तपास मसपोनि बंगडे करत आहेत. या गुन्ह्याची माहिती व चौकशीसाठी पोनि धुमाळ व मसपोनि बंगडे मार्गदर्शन केले.
पालकमंत्री नितेश राणे यांनी आज तातडीने याप्रकरणी देवगड पोलीस स्टेशनला भेट दिली. या युवकाचे सर्व बाजूने चौकशी करून गुन्हा दाखल करावा अशाप्रकारे स्पष्टपणे सूचना दिल्या आहेत.पीडित महिलेने नामदार नितेश राणे यांची पोलीस स्टेशनला भेट देऊन हकीगत कथन केली. व वस्तुस्थिती सांगितली आपणावर कोणताही अन्याय होणार नाही आपण बिनधास्त रहा.
यावेळी त्यांच्यासोबत बाळ खडपे, संदीप साटम योगेश चांदोसकर नगरसेविका तन्वी चांदोस्कर, बुवा तारी संतोष तारी, युवा कार्यकर्ते दयानंद पाटील, शहराध्यक्ष वैभव करंगुटकर,अँड सिद्धेश माणगावकर यासह अनेक जण उपस्थित होते.



