Home देवगड देवगड कोस्टल हाफ मॅरेथॉन : पर्यटनाला चालना देण्यासाठी उपक्रम २३ नोव्हेंबर रोजी...

देवगड कोस्टल हाफ मॅरेथॉन : पर्यटनाला चालना देण्यासाठी उपक्रम २३ नोव्हेंबर रोजी केले आयोजन

31
देवगड (प्रतिनिधी)
कोकणातील नैसर्गिक सौंदर्य आणि देवगडच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी देवगडमध्ये “कोस्टल हाफ मॅरेथॉन रन” या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. देवगड रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी व डॉक्टर फॅटर्निटी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. 23 नोव्हेंबर 2025 रोजी ही मॅरेथॉन पार पडणार आहे.
दौड आरोग्याची, साद देवगडच्या पर्यटनाची” या घोषवाक्याने सजलेली ही मॅरेथॉन देवगडच्या आरोग्यदायी वातावरणासोबतच पर्यटनाचे आकर्षण वाढविण्याचे कार्य करणार आहे, अशी माहिती रोटरी क्लबचे अध्यक्ष गौरव पारकर यांनी देवगड येथील डायमंड हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी खजिनदार दयानंद पाटील, सचिव अनुश्री पारकर, रो. विजय बांदिवडेकर आणि रो. रुपेश खोत उपस्थित होते.
ही स्पर्धा तीन गटांमध्ये होणार असून यामध्ये २१ कि.मी., ११ कि.मी. आणि ५ कि.मी. असे तीन गट ठेवण्यात आले आहेत.२१ कि.मी. टाईम रन : पुरुष व महिला गटांसाठीप्रथम क्रमांक ₹१००००,द्वितीय क्रमांक ₹७,०००, तृतीय क्रमांक ₹५०००/- विजेत्यांना मेडल व ऑनलाईन प्रमाणपत्रही देण्यात येईल.
११ कि.मी. टाईम रन : पुरुष व महिला गटांसाठी प्रथम क्रमांक ₹५०००द्वितीय क्रमांक ₹३०००,तृतीय क्रमांक ₹१५००, यासोबत मेडल व ऑनलाईन प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.तसेच ५ कि.मी. फन रन यामधील सर्व सहभागी स्पर्धकांना मेडल व ऑनलाईन प्रमाणपत्र तसेच स्पर्धेतील सर्वांना टी-शर्ट व आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत.
तसेच१८- ४४,४५- ५४,५५- ६४, आणि ६५ वर्षांवरील अशा चार वयोगटांमधील प्रत्येकी दोन विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत.स्पर्धेचा धावण्याचे मार्ग २१ कि.मी. रन : डायमंड हॉटेल ते कातवणेश्वर ते डायमंड हॉटेल,११ कि.मी. रन : डायमंड हॉटेल ते मिठमुंबरी बीच ते डायमंड हॉटेल तर ५ कि.मी. फन रन : डायमंड हॉटेल ते तारामुंबरी पूल ते डायमंड हॉटेल असा मार्ग असणार आहे.
या स्पर्धेसाठी इच्छुकांनी १० नोव्हेंबर २०२५ पर्यंत https://alpharacingsolution.com/ या लिंकवर ऑनलाईन नोंदणी करावी. स्पर्धेसाठी फी २१ कि.मी. ₹१२००,११ कि.मी. ₹८००,५ कि.मी. – ₹ ४०० इतकी ठेवण्यात आली आहे.१० ऑक्टोबरपूर्वी नोंदणी करणाऱ्यांना १०% सवलतही दिली जाणार आहे.
ही मॅरेथॉन स्पर्धा केवळ आरोग्य आणि फिटनेससाठीच नव्हे, तर देवगडच्या किनारपट्टीवरील पर्यटनाला नवी ओळख देणार आहे. समुद्राच्या लाटांसोबत आरोग्यदायी शर्यतीचा अनुभव घेण्याची ही एक आगळीवेगळी संधी ठरणार आहे. असेही यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष गौरव पारकर यांनी सांगितले.