सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ ठिकाणी ७ मेला रोजी होणार ‘मॉक ड्रिल’; सागरी भागांमध्ये वीजपुरवठा बंद

11

 

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी)

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ ठिकाणी ७ मेला रोजी होणार ‘मॉक ड्रिल’; सागरी भागांमध्ये वीजपुरवठा बंद

मॉक ड्रिलचा एक भाग म्हणून रात्री ८:०० ते ८:१५ या वेळेत देवगड, वेंगुर्ला व मालवण या सागरी भागांमध्ये होणार वीज बंद
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीचा भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सात ठिकाणी बुधवार,७ मे रोजी महत्त्वपूर्ण ‘मॉक ड्रिल’ (आपत्कालीन परिस्थितीचा सराव) घेण्यात येणार आहे. हा सराव दुपारी ३:०० ते ३:२० या वेळेत पार पडेल. जिल्हा प्रशासन, पोलीस, अग्निशमन दल,आरोग्य विभाग व इतर संबंधित यंत्रणा यामध्ये सहभागी होणार आहेत.
या सरावासाठी मालवण नगर पालिका क्षेत्र, वेंगुर्ला नगर पालिका क्षेत्र,सावंतवाडी नगर पालिका क्षेत्र, कणकवली नगर पालिका क्षेत्र, देवगड सागरी भाग, जिल्हाधिकारी कार्यालय
तिलारी धरण परिसर,अशा खालील ठिकाणांची निवड करण्यात आली आहे:
या दरम्यान, सरावाच्या स्वरूपात एअर अलर्ट, मदत कार्य, बचाव पथके, आपत्कालीन प्रतिसाद यासंबंधित कृती दाखवण्यात येतील. सरावानंतर सर्व संबंधित यंत्रणा सज्ज राहणार आहेत. या मॉक ड्रिलचा एक भाग म्हणून रात्री ८:०० ते ८:१५ या वेळेत देवगड, वेंगुर्ला व मालवण या सागरी भागांमध्ये वीजपुरवठा (Blackout) खंडित करण्यात येणार आहे.
महत्वाचे म्हणजे या सरावाची वेळ व स्वरूप राज्य शासनाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांवर भर द्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.