अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. नवनीत राणा यांनी केलेल्या आरोपांवर यशोमती ठाकूर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. तिवसा येथे आयोजित दहीहंडी कार्यक्रमात खासदार नवनीत राणा म्हणाल्या होत्या की, जेव्हा विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा त्या यादीमध्ये यशोमती ठाकूर यांचे सुद्धा नाव होते. यशोमती ठाकूर यांना मंत्रीपद न मिळाल्याने त्या आल्या नाही. यावर प्रत्युत्तर यशोमती ठाकुर यांनी दिले.
यशोमती ठाकूर यांनी म्हटलं की, उगाच अफवा आणि फंटूसपणा करायचा नसतो. वहिनी आहे तुम्ही आम्ही तुम्हाला वहिनी म्हणून स्वीकारलं होतं. त्यामुळे निवडणुकीच्या वेळीच आम्ही दर दर फिरलो होतो. पण खासदार वहिनींचं कास्ट सर्टिफिकेट खोट निघालं. वहिनीच चोर निघाल्या.
दरम्यान आमच्या रक्ता रक्तामध्ये सर्वधर्मसमभाव आहे. काँग्रेसच्या पलीकडे आम्ही कोणताच विचार करू शकत नाही. आमचा जीव गेला तरी चालेल, आम्ही काँग्रेस सोडू शकत नाही. हनुमानजी तुम्हाला पुढच्या काळात दाखवून देतील, असा टोलाही यशोमती ठाकूर यांनी लगावला.





