मुंबई : राज्यात पुन्हा मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. शिंदे फडणवीस सरकारचा चौथा आणि शिंदे फडणवीस पवार सरकारचा दुसरा शपथविधी होण्याची शक्यता आहे. अधिवेशन संपताच मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. १५ ॲागस्टच्या आत नवीन पालकमंत्र्यांची घोषणा होण्याची शक्यता आहे.
आमदारांची नाराजी आणि आगामी लोकसभा विधानसभा निवडणूका लक्षात घेता मंत्रीमंडळ विस्तार केला जाण्याची शक्यता आहे. भाजपा आणि शिवसेनेच्या काही मंत्रीमंडळात अंतर्गत खांदेपालट होण्याची देखील शक्यता वर्तविली जात आहे. मंत्रीमंडळ विस्तार होताच पालकमंत्री पदे देखील दिली जाण्याची शक्यता आहे.





